शेअर मार्केटमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकालाच डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? ते सुरु का आणि कसे करावे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ते कशासाठी वापरले जाते याचे उत्तर आज तुम्हाला आम्ही या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे?
वास्तविक, आजच्या ऑनलाईन युगात डिमॅट खात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण तरिही डिमॅट Demat हे एक ऑनलाईन खाते असून, शेअर मार्केटमध्ये शेअरच्या खरेदी-विक्री करताना याचा सर्वाधिक उपयोग केला जातो. त्यामुळे डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे याबद्दल अनेकांना माहिती नसते. पण आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत.
डिमॅट खाते सुरु करण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा; जर आपला मोबाईल नंबर आधारकार्डशी जोडलेला नसल्यास आपणांस ब्रोकरकडून फॉर्म आपल्या रेजिस्टरेड ई-मेल वर प्राप्त होईल व तो फॉर्म आपण हस्ताक्षर करून पुन्हा ब्रोकरला कुरियर करावे लागेल. जर आपणांस हे सर्व टाळाचे असल्यास, तुम्ही तुमचा मोबईल नंबर आधार लिंक आहे का ते पाहून, नसल्यास तो तातडीने आधारशी लिंक करुन घेणे.
तर चला चॉईस सोबत आपला फ्री डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खालील दिलेल्या प्रक्रियेचा अनुसरण करून काही मिनिटात डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता.
ज्या व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन नफा मिळवायचा आहे. त्यांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन डिमॅट खाते सुरु करता येते. हे सुरु केल्यानंतर केवळ शेअरची खरेदी-विक्रीच नव्हे, तर डिबेंचर्स आणि बॉण्डसचे देखील व्यवहार अतिशय सहजपणे करता येतील.
ज्या गुंतवणूकदारांना सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांचे शेअरचे ट्रेडिंग करुन नफा कमवायचा आहे, त्यांचे डिमॅट खाते असणे आवश्यक्ता असते. कारण, त्याशिवाय तुम्हाला शेअर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करता येत नाही.
खरेतर, डिमॅट खाते हे एखाद्या बँक खात्याप्रमाणेच असते. मात्र, याचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीनेच होत असल्याने, ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हाताळले जाते.
तुम्हाला तुमचे बँक खाते सुरु करण्यासाठी काही कागदपत्रे द्यावी लागतात. त्याचप्रमाणे डिमॅट खाते सुरु करण्यासाठी ही काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यकता असते. ती कोणती, हे आपण पुढे जाणून घेऊया;
डिमॅट खाते सुरु करताना इतर कागदपत्रांसोबत एजन्टला दिलेल्या पॉवर ऑफ अँटर्नीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. पॉवर ऑफ अँटर्नीच्या द्वारे आपण जेव्हा शेयर खरेदी किंवा विक्री करतो तेव्हा ब्रोकर आपल्या डिमॅट अकाउंट मधून विशिष्ट शेयर वजा किंवा अधिक करतो. जर, पॉवर ऑफ अँटर्नीवर स्वाक्षरी नाही केल्यास आपणांस प्रत्येक वेळी एडिस पिन जनरेट करून ट्रेड करावे लागेल.
डिमॅट खाते म्हणजे शेअर्स, बॉण्डस, डिबेंचर्स, सरकारी रोखे आदी होय. साध्या शब्दात सांगायचे तर कागदी स्वरुपातील शेअर्स सर्टिफिकेट सांभाळून ठेवणे अतिशय जोखमीचे असल्याने डिमॅट (डिमटेरियलाझेशन) करुन इलेक्टॉनिक रेकॉर्डच्या स्वरुपात ज्या खात्यात ठेवण्याच्या प्रक्रियेला डिमॅट असे म्हणतात. आणि हे ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवले जाते, त्याला डिमॅट खाते असे म्हणतात. त्या खात्याची नोंद सीडीएसएल (Central Depository Services Limited) कडे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरुपात असते. जर आपणांस डिमॅट खात्याविषयी अजून घ्यायचे असल्यास, Demat Account Meaning in Marathi या लेखात सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
आपल्या देशात शेअर्स आणि सेक्यूरिटिज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्टोअर करण्यासाठी डिमॅट प्रणाली अस्तित्वात आली. त्यानंतर १९९६ साली डिपॉझटरी कायद्यानुसार या सिस्टिममुळे शेअर्स विकत घेणे आणि त्याचे हस्तांतरण करणे अतिशय सोपे झाले. तसेच शेअर सर्टिफिकेटशी संबंधित इतर धोकेही कमी झाले. त्यामुळे १९९६ पासून राष्ट्रीय शेअर मार्केट (NSE) मध्ये डिमॅट व्यवहार सुरु झाले. त्यानंतर एकप्रकारे शेअर मार्केटमध्ये पेपरलेस व्यवहारांची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, डिमॅट प्रणालीमुळे कंपन्यांनाही बराच फायदा झाला. कंपन्यांना आपले नवीन शेअर इश्यू करणे आणि त्याच्या वाटपामध्ये लागणारा वेळ आणि पैसा यात बचत झाली.
डिमॅट खात्याचे मुख्यत्वे तीन प्रकार (types of demat account) पडतात. चला आता त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया;
१. नियमित (Regular) डिमॅट खाते:- या डिमॅट खात्याद्वारे कोणत्याही भारतीय गुंतवणूकदारांनी ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेले शेअर ठेवण्यासाठी वापरले जाते.
२. प्रत्यावर्ती म्हणजे Repatriable डिमॅट खाते:- Repatriable किंवा थोडक्यात NRI डिमॅट खाते हे अनिवासी भारतीय म्हणजे NRI व्यक्तींसाठी असून, याद्वारे परदेशात पैसे हस्तांतरित करता येतात. त्यामुळे Repatriable डिमॅट खाते हे त्या व्यक्तीच्या NRE बँक खात्याशी लिंक करणे अतिशय गरजेचे असते.
३. अप्रत्यावर्ती (Non- Repatriable) डिमॅट खाते:- Non- Repatriable डिमॅट खाते देखील Repatriable डिमॅट खात्याप्रमाणे अनिवासी भारतीय (NRI) साठी आहे. मात्र, या खात्यास परदेशात पैसे हस्तांतरित करता येत नाहीत. तसेच, हे NRO बँक खात्याशी जोडावे लागते.
पूर्वी आपल्याकडील बँका डिमॅट खाते सुरु करण्यासाठी किमान ७०० रुपये ते ९०० रुपये शुल्क आकारत होत्या. मात्र, सध्या डिमॅट खाते सुरु करण्यासाठी DP (Depository Participant) कडून शुल्क आकारण्यात येते. यातील Depository मध्ये NSDL (National Securities Depository Limited) किंवा CSDL (Central Depository Services Limited) चा प्रामुख्याने समावेश होतो.
जेव्हा एखादा गुंतवणूकदार आपल्या होल्डिंगमधून विक्री केलेल्या शेअरसाठी ज्या दिवशी विक्रीची ऑर्डर देतो, तेव्हा त्या दिवशी गुंतवणुकदारांना डिपी (Depository Participant) चार्जेस द्यावे लागतात. इथे एक गोष्ट प्रामुख्याने नमुद करावी लागेल, ती म्हणजे शेअर खरेदी करताना डिपी चार्जेस लागू होत नाहीत. सर्वसाधारणपणे CSRL कडून ५.५ तर NSDL कडून १५ रुपये शुल्क आकारले जाते.
तसेच, या व्यतिरिक्त प्रत्येक ब्रोकर वेगवेगळे DP charges आकारतो ते रु. १० ते २५ पर्यंत आहेत. जर आपण चॉईस सोबत डिमॅट अकाउंट ओपन केला तर आपणांस फक्त रु. १० DP चार्जेस आकारण्यात येईल इतर सर्व ब्रोकरच्या तुलनेत खूपच कमी आहे.
उत्तर:- डिमॅट खाते हे एक व्यक्तीविशेष खाते असल्याने, त्याद्वारेच गुंतवणूकदारांना शेअरची खरेदी-विक्री करता येते. त्यामुळे ते हस्तांतरित करता येत नाही. मात्र, गुंतवणूकदांरांना त्यांच्याकडील शेअरची विक्री करायची असल्यास, ते करणे सहज शक्य आहे.
उत्तर:- ज्याप्रमाणे आपल्याकडे आपल्याला एकपेक्षा जास्त बँक खाते उघडता येते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदार देखील एकपेक्षा अधिक डिमॅट खाते सुरु करु शकतात. मात्र एका कंपनीत जास्तीत जास्त तीन खाती उघडता येतात.
प्रश्न:- बँक खात्याप्रमाणे डिमॅट खातेदेखील जॉईंट खाते असू शकते का?
उत्तर:- हो. बँक खात्याप्रमाणे गुंतवणूकदारांना आपले डिमॅट खाते जॉईंट होल्डर Joint Holder मिळूनही सुरु करु शकता.
प्रश्न:- डिमॅट खाते सुरु केल्यानंतर खात्यात किमान रक्कम minimum balance ठेवणे गरजेचे आहे का?
उत्तर:- डिमॅट खाते सुरु केल्यानंतर त्यात किमान रक्कम minimum balance ठेवण्याचे कोणतेही बंधन किंवा त्याप्रकारचा कोणता नियमही नाही.
प्रश्न:- म्युच्युअल फंडसाठी डिमॅट कितपत आवश्यक आहे?
उत्तर:- म्युच्युअल फंडसाठी डिमॅट खाते आवश्यक नाही. मात्र डिमॅट खाते असल्यास गुंतवणूकदारांना ऑनलाईन पद्धतीने शेअर, सेक्यूरिटीज, म्युच्युअल फंड, विमा यांसरख्या विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करता येते.
आतापर्यंत आपण डिमॅट खाते म्हणजे काय? त्याचा इतिहास, त्याचे प्रकार, ते का सुरु करावे आणि डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे? प्रक्रिया याबद्दल सविस्तर जाणून घेतले. ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल. तसेच, या माहितीमुळे नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडली असेल, अशी आशा आहे.
डिमॅट बद्दल आणखी काही शंका तुमच्या मनात असेल, किंवा जर शेअर बाजार गुंतवणुकीसंबंधित कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल, पुढील दिलेल्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. चॉईसच्या संकेत स्थळावर भेट दिल्यानंतर दिलेल्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरा. आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील. आणि तुमच्या शंकांचे निरसन करतील!