शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे डिमॅट खाते असणे आवश्यक असते. पण डिमॅट खाते म्हणजे काय? हे तुम्ही कधी हे जाणून घेतले आहे का.
आज या लेखाच्या माध्यमातून आपण डिमॅट अकाऊंटबाबत माहिती जाणून घेऊया. तसेच, त्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये देखील जाणून घेऊयात!
डीमॅट खाते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स आणि सिक्युरिटीज ठेवू देते. पूर्वीच्या काळी स्टॉकची देवाण-घेवाण भौतिक स्वरुपातच (Physical Format) होत होती. तसेच ट्रेडर्सना शेअरची नोंद देखील भौतिक स्वरुपात ठेवावी लागत होती. त्यामुळे व्यापाऱ्यांना नेहमीच आपल्या शेअरच्या चोरीची किंवा फसवणुकीची भिती असायची.
ट्रेडर्सच्या चिंतेवर १९९६ मध्ये तोडगा मिळाला. जेव्हा डिमॅट अकाऊंटचा पर्याय व्यापाऱ्यांना मिळाला. या पर्यायामुळे ट्रेडर्सना आपले शेअर इलेक्ट्रॉनिक रुपात रुपांतरित करण्याची संधी मिळाली.
चला तर मग... जाणून घेऊया; डिमॅट अकाऊंट (about Demat account) आणि त्याची शेअर बाजारात नेमकी काय भूमिका आहे!
डिमॅट अकाऊंची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत;
सेफ ट्रेन्सफर- डिमॅट अकाऊंटपूर्वी गुंतवणुकदारांना शेअरची जर विक्री करायची असेल, तर त्यांना पहिल्यांदा संबंधित कंपनी किंवा ट्रेडर्सच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी पाठवावे लागत होते. आणि हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागत होता. मात्र, डिमॅट खात्याबाबत असे नाही. आता ट्रेडर्स कोणत्याही वेळी अतिशय कमी वेळेत शेअर हस्तांतरित करु शकतात.
वेळेची बचत-डिमॅट अकाऊंटमुळे भौतिक स्वरुपातील (फिजिकल) शेअर इलेक्ट्रॉनिक्स (डिजिटल) फॉर्मेटमध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. ज्यामुळे गुंतवणुकदारांना शेअर ट्रेडिंग करणे अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे वेळेचीही बचत झाली आहे.
स्पीड-ई सुविधा- नॅशनल सेक्यूरिटी डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड (NSDSL) नुसार, तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपेंट (DP)ला भौतिक स्लिपमध्ये पाठवण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक रुपात पाठवणे शक्य आहे. ज्यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल.
सरळ उपयोग-पूर्वी गुंतवणुकदारांना आपला पोर्टफोलिओ आणि हताळण्यावर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या स्टॉक ब्रोकर्सचा आधार घ्यावा लागत होता. ज्यामुळे खात्यावर लक्ष ठेवणे अतिशय अवघड होत होते, तसेच त्याला वेळही लागत होता.
मात्र, आता असे होत नाही. गुंतवणुकदार अतिशय सहजपणे आपल्या मोबाईल फोनवरुनही कुठेही बसून खात्यावर लक्ष ठेवू शकतात.
तर ही आहेत डिमॅट अकाऊंटची काही वैशिष्ट्ये, ज्याच्या आधारे तुम्हाला हे लक्षात आले असेल की, डिमॅट अकाऊंटचा वापर केल्याने तुम्हाला काय-काय फायदे होऊ शकतात.
आता आपण जाणून घेऊया की, कितीप्रकारचे डिमॅट अकाऊंट असतात.
जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करुन नफा कमवू इच्छिता, तर त्यासाठी तुमचे अँक्टिव डिमॅट अकाऊंट असणे गरजेचे आहे. शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी विविध प्रकारचे ट्रेडिंग अकाऊंट उपलब्ध आहेत.
तुम्हाला नावावरुनच लक्षात आले असेल की, हे उघडण्यासाठी तुम्हाला भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
यामध्ये तुम्हाला ५० हजार रुपयापर्यंतच्या जमेवर कोणतेही शुल्क नसते. मात्र, ५० हजार ते दोन लाख रुपयापर्यंतच्या जमा रकमेवर १०० रुपये शुल्क आकारले जाते. तसेच, दोन लाखापेक्षा मोठ्या रकमेवर वेगवेगळ्या टप्प्यानुसार एएमसी शुल्क आकारले जाते.
अनिवासी भारतीयांना देशात ट्रेडिंग करण्यासाठी दोन प्रकाराचे खाते उपलब्ध असून, त्यापैकी Repatriable डिमॅट अकाऊंट हा एक प्रकार आहे. अनिवासी भारतीय Repatriable डिमॅट अकाऊंटचा वापर करतात, त्यांना परदेशी मुद्रा प्रतिबंध कायद्याच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते.
Repatriable डिमॅट अकाऊंटमुळे अनिवासी भारतीयांना भारतीय शेअर बाजारातून कमावलेला नफा आपल्या परदेशातील बँक खात्यात जमा करण्याची सुविधा मिळते. त्यासाठी Repatriable डिमॅट खातेधाकरांना आपले खाते NRE बँक खात्याशी संलग्न (लिंक) करणं आवश्यक असते.
तुम्हाला सांगितलं पाहिजे की, Repatriable डिमॅट अकाऊंट सुरु करण्याची सुविधा सर्व बँका आणि स्टॉक ब्रोकर्सकडे उपलब्ध असते.
Non- Repatriable डिमॅट अकाऊंट हे देखील अनिवासी भारतीयांसाठी (NRI) देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठीचा दुसरा पर्याय आहे. Non- Repatriable खातेधारकांना भारतीय शेअर बाजारातून कमावलेल्या नफा आपल्या परदेशी बँकांत जमा करण्याची परवानगी नसते.
Non- Repatriable डिमॅट खातेधारकांना आपले खाते NRO (Non-Repatriable Ordinary) सोबत संलग्न (Link) करणे अनिवार्य असते. ज्याचे संचालयन सेव्हिंग अकाऊंटसोबत बचत खाते असते.
NRI दर्जा मिळण्यापूर्वी रेग्यूलर डिमॅट अकाऊटवाले गुंतवणूकदार आपले खाते भारत सोडल्यानंतर सहजपणे Non-Repatriable डिमॅट अकाऊंट करु शकतात.
ज्याप्रमाणे कोणतेही खाते सुरु करण्यासाठी कागदपत्रांची आवश्यक्ता असते, त्याप्रमाणेच डिमॅट खाते सुरु करण्यासाठी काही कागदपत्रांची अवश्यक्ता असते. ज्याच्याद्वारे तुम्ही डिमॅट अकाऊंट सुरु करु शकता.
वर दिलेल्या माहितीवरुन तुम्हाला हे समजले असेल की, डिमॅट खाते म्हणजे काय? आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, डिमॅट खाते तुम्ही अतिशय सोप्या पद्धतींचा वापर करुन कसे सुरु शकता. हे खाते तुम्ही कोणत्याही स्टॉकब्रोकरसोबतही सुरु करु शकता.
पहिला टप्पा-डिमॅट खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एका डिपॉजिटरी पार्टिसिपेंट (डीपी) च्या पर्यायाची निवड करावी लागते. डीपीसोबत आपले बेनिफिशियल ओनर (बीओ) खाते सुरु होईल.
दुसरा टप्पा-डिमॅट खात्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. लक्षात ठेवा; तुम्ही देत असलेली कागदपत्रे आणि तुमची संपूर्ण माहिती त्यात भरत आहात- ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पॅन कार्ड इ. (डिमॅट खाते सुरु करण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे हे लक्षात ठेवा.)
तिसरा टप्पा-कागदपत्रे जमा केल्यानंतर नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचून त्या तुम्हाला त्या मान्या असल्यास, मान्यता द्या. त्यानंतर तुम्हाला डीपी खाते सुरु करण्याचे शुल्क जमा करावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डीपी अधिकारी तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करतात.
चौथा टप्पा-तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही तुमचे डिमॅट खाते सुरु करुन शेअर ट्रेडिंग सुरु करु शकता.
डिमॅट खाते सुरु करण्याची प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील करता येऊ शकते. तसेच खाते सुरु करण्याचे शुल्क देखील तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार भरता येते.
जेव्हा तुम्ही डिमॅट खाते सुरु करु इच्छिता, तेव्हा त्याच्या प्रक्रियेसाठी स्टॉकब्रोकरला काही शुल्क द्यावे लागते. पूर्वी हे शुल्क अतिशय जास्त होते. पण आता काही स्टॉकब्रोकर डिमॅट खाते मोफत काढून देतात.
डिमॅट खाते सुरु करण्याचे शुल्क ०-५०० रुपये असू शकते. मात्र जर तुम्ही डिमॅट खाते चॉईस ब्रोकिंगसोबत सुरु करु इच्छिता, तर तुम्हाला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
कोणतेही शुल्क न भरता तुम्ही शेअर ब्रोकिंगच्या सेवेचा लाभ घेऊ शकता.
डिमॅट खात्याच्या पर्यायामुळे भारतीय स्टॉक बाजारात मोठ्याप्रमाणात बदल झाल्याचे आपण पाहिले. मात्र आजूनही काहीजणांना प्रश्न पडला असेल की, हे सुरक्षित आहे की नाही, चला तर मग याच्या फायद्याबाबत जाणून घेऊया.
पूर्वी गुंतवणूकदारांना आपल्याकडील भौतिक स्वरुपातील शेअर सांभाळून ठेवावे लागत होते. ज्यासाठी पुष्कळ कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. त्यामुळे शेअरची चोरी होऊ नये, यासाठी ते अतिशय सांभाळून ठेवणे महत्त्वाचे असायचे.
मात्र, आता असे नाही. डिमॅट खात्याच्या पर्यायामुळे आता शेअर डिजिटल फॉर्मेटमध्ये उपलब्ध असतात. ज्यामुळे शेअर सांभाळून ठेवण्याच्या त्रासातून त्यांची मुक्तता झाली आहे.
डिमॅट अकाऊंटमुळे ज्याप्रकारे ग्राहकांची शेअर्स सांभाळून ठेवण्याच्या त्रासातून मुक्तता झाली आहे, त्याचप्रकारे त्याचे हस्तांतरण ही अतिश सुलभ झाले आहे.
डिमॅट खात्याच्या पर्यायापूर्वी गुंतवणूकदारांना आपले शेअर्स सांभाळून ठेवण्यासह, भौतिक स्वरुपातच हस्तांतरणाची प्रक्रिया करावी लागत होती. ज्यात बराच वेळ जात होता. मात्र अधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि डिमॅट खात्याच्या मदतीमुळे गुंतवणूकदारांच्या अडचणी दूर झाल्या आहेत.
जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करता, तेव्हा कंपनी वेळोवेळी त्याबदल्यात बोनस किंवा लाभांश देते. हा बोनस डिमॅट खात्याच्या माध्यमातून तुम्ही सहज प्राप्त करु शकता.
याशिवाय जर कंपनी शेअरचे विभाजन करते, तेव्हा त्याचा अपडेट क्रमांक तुम्हाला तुमच्या डिमॅट खात्यात पाहायला मिळतो.
डिमॅट खात्यामुळे गुंतवणूकदारांना कुठेही बसून शेअरची खरेदी-विक्रीची सुविधा मिळते. त्यासोबतच डिमॅट खात्याने ट्रेडर्सना आपल्याकडील होल्डिंगवर लक्ष ठेवणे आणि आपला पोर्टफोलिओवर नियंत्रण ठेवणे सोपे केले आहे.
जर तुम्ही असा विचार करत असाल की, डिमॅट खात्यात केवळ इक्विटी शेअरच स्टोअर करण्यास सक्षम आहे, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण डिमॅट खात्याच्या माध्यमातून तुम्ही जास्तीची बचत करु शकता. ज्याप्रमाणे ईएफटी (EFT), बॉन्ड (Bonds) इ.
डिमॅट खाते सुरु करण्याचे वरील फायदे असून, ज्यामुळे तुम्ही भारतीय शेअर बाजारात सहज ट्रेडिंग करु शकता. आतापर्यंत आम्ही तुम्हाला डिमॅटच्या फायद्यांबदद्ल सांगितले, त्यानंतर काही नुकसानीबाबतही आवगत करु.
जर डिमॅट खात्याचे इतके फायदे आहेत, तर त्याचे काही नुकसान देखील आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला डिमॅटच्या नुकसानीची माहिती देतो.
जेव्हा तुम्ही कोणत्याही स्टॉकब्रोकरच्या माध्यमातून डिमॅट खाते सुरु करता, तेव्हा स्टॉकब्रोकर्सना विविध प्रकारचे शुल्क द्यावे लागते. ज्यात स्टॉकब्रोकर तुम्ही फसवणूक करत, अवाजवी शुल्क आकारु शकतो.
जरी डिमॅट खात्यामळे शेअर बाजारातील ट्रेडिंगसोबतच आपल्या पोर्टफोलिओवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. तरीही त्यामध्ये काही नकारात्मक पैलू देखील आहेत. जसे की अनेक नवोदित गुंतवणूकदार शेअर ट्रेडिंग अतिशय सहज आणि सोपे असल्याचे समजून डिमॅट खाते सुरु करतात, पण शेअर ट्रेडिंग करताना आपल्या कष्टाच्या कमाईचा मोठा भाग गमावून बसतात.
प्रत्येक व्यक्तीला तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे असते असे नाही. कारण अनेक गुंतवणूकदार डिमॅट खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा कमावतात. पण अनेक गुंतवणूकदारांना तंत्रज्ञानाची योग्य माहिती नसल्याने डिमॅट अकाऊंट सुरु करुन मध्येच ट्रेडिंग करणे सोडून देतात.
वरील लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डिमॅट खाते म्हणजे काय (Demat account meaning in Marathi), त्याचे प्रकार, फायदे आणि नुकसान याची संपूर्ण माहिती दिली. शेअर ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला केवळ एका ट्रेडिंग अकाऊंटची गरज असते. ज्याद्वारे तुम्ही कधीही कुठेही शेअर ट्रेडिंग करु शकता.
डिमॅट खात्यासोबत ट्रेडिंगसाठी खात्याची गरज असते. गुंतवणूक करण्यापूर्वी डिमॅट आणि ट्रेडिंगमध्ये काय अंतर आहे, याची माहिती असणे गरजेचे असते.
डिमॅट खात्यामुळे शेअर्सना सांभाळून ठेवणे, त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या त्रासातून मुक्तता झाली आहे. तसेच फसवणुकीचे प्रकारही टाळण्यास मदत मिळाली आहे.
पूर्वीच्या तुलनेत डिमॅट खात्यामुळे शेअर ट्रेडिंग अतिशय सोपे झाले असून, कुठेही बसून कधीही शेअर ट्रेडिंग करणे शक्य झाले आहे.
जर तुम्हालाही तुमचे पैसे गुंतवणूक करुन नफा कमवायचा असेल, तर शेअर ट्रेडिंग करुन तुम्ही मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकेल.
वर दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल, अशी आम्हाला आशा आहे. जर शेअर बाजाराशी संबंधित कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल, तर खाली दिलेला फॉर्ममध्ये तुम्ही माहिती भरु शकता. आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील.