आतापर्यंत तुम्ही शेअर मार्केटबद्दल बरीच माहिती जाणून घेतली असेल, शेअर म्हणजे काय, डिमॅट खाते उघडणे वगैरे. आता आम्ही तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे काय आणि ट्रेडिंग अकाऊंटचे शेअर मार्केट मधील महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया ट्रेडिंग आणि त्याचे प्रकार, तसेच त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल...
ट्रेडिंग याला मराठीत शब्दश: व्यापार असे म्हणतात. मात्र शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग या शब्दाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण, ट्रेडिंग या एकाच शब्दाने शेअर मार्केटचे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे.
ज्याप्रमाणे एखादा दुकानदार काही ठराविक किमतीत वस्तू विकत घेतात, आणि त्यापेक्षा जास्त किमतीने ते ग्राहकांना विकतात, यालाच सर्वसामान्य भाषेत व्यवहार असे म्हणतात. पण शेअर मार्केटच्या भाषेत यालाच ट्रेडिंग असे म्हटले जाते. म्हणजे शेअर घ्यायचे आणि नफ्यासाठी ते विकायचे या सर्व प्रक्रियेला ट्रेडिंग म्हटले जाते.
ट्रेडर या शब्दावरुनच तुम्हाला समजले असेल कि, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती वस्तूची खरेदी विक्री करतो, त्याला व्यापारी असे म्हणतात. त्याचप्रमाणे शेअर मार्केटच्या भाषेत शेअरची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तीला ट्रेडर म्हटले जाते. शेअर मार्केटमध्ये ट्रेडरला स्टॉक ट्रेडर किंवा इक्विटी ट्रेडर असे देखील म्हटले जाते.
स्टॉक ट्रेडर म्हणजे एक अशी व्यक्ती किंवा संस्था असते, जी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन, शेअरच्या खरेदी-विक्रीतून नफा कमवण्याचा प्रयत्न करते. स्टॉक ट्रेडर हे सर्वसामान्य गुंतवणूकदार, किंवा एजंट, स्टॉक ब्रोकरही असू शकतात.
जे स्टॉक ट्रेडर स्वत: च्या खात्याद्वारे ट्रेडिंग करतात, त्यांना प्रोप्रायटरी ट्रेडिंग म्हणतात. काहीवेळेस गुंतवणूकदार शेअरच्या खरेदी-विक्रीसाठी अधिकृत एजंटचा आधार घेऊनही ट्रेडिंग करतात. हा व्यवहार स्टॉक ब्रोकरमार्फत होत असल्यासाने एजंटना त्यासाठी कमिशन दिले जाते.
वास्तविक, शेअर ट्रेडिंग करणे अतिशय सोपे आहे. त्यासाठी गुंतवणूकदार सोप्या पद्धतीचा अवलंब करुन, सहज ट्रेडिंग सुरु करु शकतात. चला तर मग शेअर ट्रेडिंग सुरु करावे याबद्दल जाणून घेऊया.
१. जसे की आपण जाणतोच, की शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांचे डिमॅट खाते असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे डिमॅट खात्यासोबत गुंतवणूकदारांकडे ट्रेडिंग खाते देखील असणे आवश्यक असते. त्यासाठी गुंतवणूकदार कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून डिमॅट आणि ट्रेडिंग खाते सुरु करु शकतात.
२. जर गुंतवणूकदारांना कमी वेळेत सुरक्षित ट्रेडिंग करायचे असेल, तर एखाद्या चांगल्या स्टॉक ब्रोकरची निवड करावे लागते. कारण, स्टॉक ब्रोकर हा गुंतवणूकदार आणि स्टॉक एक्सचेंजमधील दुवा म्हणून काम करतो. त्यामुळे हा स्टॉक ब्रोकर संबंधित गुंतवणूकदारास डिमॅट आणि ट्रेडिंग खाते काढण्याची सुविधा देतो.
३. डिमॅट आणि ट्रेडिंग खाते सुरु केल्यानंतर कोणताही गुंतवणूकदार अतिशय सहजपणे शेअरची खरेदी-विक्री करुन नफा कमवू शकतो. मात्र ट्रेडिंग हे अतिशय जोखमीचे असल्याने, गुंतवणुकदारांना कधीही नफा-तोटयाचा समाना करावा लागू शकतो. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी स्टॉक ब्रोकरच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग करणे अतिशय फायद्याचे आणि सुरक्षित ठरते.
गुंतवणूकदारांना डिमॅट आणि ट्रेडिंग खाते सुरु करण्यासाठी इतर खात्याप्रमाणे काही कागदपत्रे देण्याची आवश्यकता असते. ही कागदपत्रे खालीलप्रमाणे;
शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडिंगचे तीन प्रमुख प्रकार असतात. पण ट्रेडर नफा कमाविण्यासाठी आपल्या सोईनुसार ट्रेडिंगच्या विविध पर्याचांचा वापर करुन शेअर ट्रेडिंग करतात. पण तरीही शेअर ट्रेडिंगचे प्रकार आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. ते पुढीलप्रमाणे;
१. स्कॅप्लिंग ट्रेडिंग
२. इंट्राडे ट्रेडिंग
३. स्विंग ट्रेडिंग
४. पोझिशनल ट्रेडिंग
आता आपण या चारही प्रकारांबाबत सविस्तर जाणून घेऊया.
स्कॅप्लिंग ट्रेडिंग हा काही क्षणातच शेअरच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार असून, यामध्ये शेअर ट्रेडर हे काही सेंकद किंवा काही मिनिटांसाठी शेअरची खरेदी-विक्री करतात. शेअर ट्रेडिंगच्या या प्रकारास स्कॅप्लिंग ट्रेडिंग म्हणतात. स्कॅप्लिंग ट्रेडिंग हा अतिशय जोखमीचा प्रकार असून, नवीन गुंतवणूकदारांना याचा वापर करताना जास्त काळजी घेण्याची गरज असते.
केवळ एका दिवसासाठी होणाऱ्या व्यवहारास इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात. शेअर मार्केट सुरु (Share Market Timings) झाल्यानंतर (सकाळी ९.१५) इंट्राडे ट्रेडर शेअरची खरेदी करतात, आणि शेअर मार्केट जेव्हा बंद होण्यापूर्वी (दुपारी ३.३०) खरेदी केलेल्या स्टॉकची विक्री करतात. या प्रक्रियेस इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात.
जे ट्रेडर काही दिवसांसाठी शेअरची खरेदी-विक्री करतात, त्या प्रक्रियेस स्विंग ट्रेडिंग असे म्हटले जाते. या प्रक्रियेत शेअर ट्रेडर हे काही आठवड्यांसाठी शेअरची खरेदी करुन, त्याची विक्री करतात. त्यामुळे अशा ट्रेडर्सना शेअर मार्केटमधील दनैंदिन हालचालींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागत नाही. जे शेअर मार्केटमधील ट्रेडिंग प्रक्रियेत पूर्णवेळ सक्रिय राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्विंग ट्रेडिंग हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
एखादा गुंतवणूकदार चांगल्या नफ्यासाठी शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन हालचाली कॅप्चर करण्यासाठी ट्रेडिंग करतो, त्याला पोझिशनल ट्रेडिंग असे म्हणतात. त्यामुळे पोझिशनल ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांवर शेअर मार्केटमधील रोजच्या चढ-उतारांचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा अतिशय उत्तम आणि फायदेशीर पर्याय आहे.
शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. ते पुढील प्रमाणे
शेअर ट्रेडिंग | गुंतवणूक |
अल्पकालिन नफ्यासाठी खरेदी-विक्री | दीर्घकालीन नफ्यासाठी खरेदी-विक्री |
शेअर ट्रेडिंगमध्ये मार्केटमधील सद्यस्थिती जाणून घेऊन, शेअरच्या खरेदी-विक्रीचे निर्णय घ्यावे लागतात. | ज्या संस्थेच्या किंवा कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्या संस्थेची किंवा कंपनीची संपूर्ण माहिती, कंपनीचा व्यवसाय, याची सविस्तर माहिती घेऊन त्याच विचार करुन गुंतवणूक करावी लागते. |
शेअर ट्रेडिंगमध्ये खरेदी केलेल्या शेअरची किंमत वाढल्यानंतर ते तत्काळ विकून नफ्याचा लाभ घेता येतो. | एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवून, त्याच्या प्रगतीनुसार शेअरची किंमत वाढते. |
१. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा सर्वाधिक फायदा म्हणजे बँकांमधील एफडी, बचत खाते, आरडी आदीसारख्या गुंतवणुकीच्या तुलनेत कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा कमावता येतो.
२. जेव्हा एखादा गुंतवणूकदार लिस्टेड कंपनीचे शेअर खरेदी करतो, तेव्हा गुंतवणूकदाराच्या शेअरचे प्रमाण कितीही कमी असले, तरी तो कंपनीचा भागीदार असतो.
१. बँकामधील एफडी, बचत खाते, आरडी, आदी प्रकारातील गुंतवणुकीत नफ्याची खात्री असते. त्या प्रकारे ट्रेडिंगमध्ये नफ्याची खात्री नसते.
२. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे नेहमीच जोखमीचे असते, कारण शेअर मार्केटमधील चढ-उतारांमुळे अनेकदा गुंतवणुकदारांना नुकसानीचा सामना करावा लागतो.
आतापर्यंत आपण शेअर ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग कसे करावे, त्याचे प्रकार, ट्रेडिंग व गुंतवणूक यातील फरक आणि त्याचे फायदे व तोटे याबद्दल जाणून घेतले. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे जसे अनेक फायदे आहेत. तसे काही तोटेही आहेत. त्यामुळे शेअर ट्रेडिंग करताना अतिशय डोळसपणे ते करावे लागते. त्यासाठी शेअर मार्केटच्या मूलभूत गोष्टींसह त्यातील बारकावे आणि हालचाली समजून घेणे गरजेचे असते. तसेच गुंतवणुकीपूर्वी संशोधन आणि अभ्यास करुन केल्यास, जोखमीचे प्रमाण कमी राहते. तर जास्तीत जास्त नफा कमावता येऊ शकतो.
जर शेअर बाजार गुंतवणुकीसंबंधित तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल, पुढे दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा. आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील. किंवा तुम्हाला तुमचे डिमॅट खाते सुरु करायचे असेल, तर या लिंकवर अवश्य भेट द्या!