मानवाला आपल्या अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, हे आपण सर्वजणच जाणतो. त्यासाठी गरज असते ती पैशांची! हे पैसे कमावण्याचे बरेच पर्याय आहेत. त्यासाठी काहीजण नोकरीचा मार्ग अंवलंबतात; तर काहीजण व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमावतात.
आजच्या अधुनिक आणि तंत्रज्ञानाने युक्त युगात पैसे कमवण्यासाठी अनेकांकडून ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा ही वापर केला जातो. तर काहीजण इन्स्टाग्राम, यूट्यूबसारख्या सोशल मीडियाचा वापर करुनही पैसे मिळवतात. कारण, पैशांमुळेच त्यांना त्यांच्या मूलभूत गरजांसह आपली स्वप्ने पूर्ण करता येतात.
त्यामुळे ज्यांच्या गरजा जास्त आहेत, ते आपल्याकडील पैसे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात गुंतवून, अधिक नफा कमविताना आपण पाहतो. त्यासाठी ते स्थावर मालमत्ता (property) , सोने खरेदी (gold), किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिकाधिक नफा कमावताना आपण पाहतो.
तेव्हा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा कसा कमावण्याचा तिथे गुंतवणूक कशी करावी, याबद्दल प्रत्येकालाच माहिती हवी असते. जर तुम्हाला शेयर मार्किट गुंतवणूक ची सर्व माहिती असेल तर तुम्ही सहज तुमचे डिमॅट खाते उघडू शकता आणि त्यात शेअर्स खरेदी करू शकता. चला तर मग शेअर मार्केट म्हणजे काय आणि त्याचे व्यवहार आणि तिथे गुंतवणूक कशी करावी? याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेऊया.
‘शेअर’ म्हणजे भागभांडवल किंवा समभाग. आणि ज्या ठिकाणी याची खरेदी-विक्री होते, ते ठिकाण म्हणजे शेअर मार्केट. साध्या शब्दात सांगयचे तर एखादी कंपनी आपल्या भागभांडवलाची खरेदी-विक्री ज्या ठिकाणी करते ते ठिकाण म्हणजे शेअर मार्केट. आपल्या देशात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) असे दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत.
BSE किंवा NSE मध्ये लिस्टेड किंवा सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरची खरेदी-विक्री ही शेअर ब्रोकरच्या माध्यमातून होते. त्यासोबतच बाँड्स, म्युच्यूअल फंड आणि डेरिव्हेटिव्ह यांचीही शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्री होत असते.
एखाद्या कंपनीचा जेव्हा विस्तार होत असतो, तेव्हा त्या कंपनीचा मालक किंवा संचालक कंपनीच्या अधिकाधिक विस्ताराचा विचार करत असतो. त्यासाठी त्याला भांडवलाची अवश्यकता असते. हे भांडवल तो शेअर मार्केटमधून उभा करतो. हे भांडवल उभे करताना कंपनीचा मालक किंवा संचालक आपली कंपनी सार्वजानिक करुन त्याचे भांगभांडवल किंवा समभाग म्हणजे शेअर्स हे मार्केटमध्ये विक्रीस आणतो.
ज्यांना त्या कंपनीवर विश्वास असतो, ते त्या कंपनीचे भागभांडवल म्हणजेच ‘शेअर’ खरेदी करुन घर बसल्या पैसे कमावतात.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE ही अशिया खंडातील सर्वात जुनी संस्था अशून, १८७५ मध्ये याची स्थापना झाली. शेअर ट्रेडिंगसाठीची देशातील BSE ही अव्वल संस्था असून, जगातील ११ व्या स्थानी गणली जाते. पाच हजार पेक्षा जास्त कंपन्यांची बीएसईद्वारे कर्जरोखे म्हणजेच बॉण्ड किंवा Share भागभांडवलांची खरेदी-विक्री होते.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा देखील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजप्रमाणे देशातील एक रोखे बाजार आहे. याची स्थापना १९९२ साली झाली. सध्या NSE च्या माध्यमातून १,६९६ कंपन्या कर्जरोखे व समभागांची खरेदी विक्री करतात.
शेअर म्हणजे हिस्सा किंवा भागभांडवल! जेव्हा एखादा व्यक्ती व्यवसाय सुरु करु इच्छितो, तेव्हा काही भांडवल गुंतवून तो आपला व्यवसाय सुरु करतो. त्या व्यवसायातून त्याला जो नफा किंवा तोटा होतो, त्याला तो व्यक्ती जबाबदार असतो. अशा व्यवसायाला proprietor firm म्हणतात.
पण जेव्हा त्या व्यक्तीकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक भांडवल नसते, तेव्हा तो त्याचे मित्र किंवा नातेवाईकांना सोबत घेऊन भांडवल उभे करुन आपला व्यवसाय सुरु करतो. तेव्हा व्यवसायाला partnership firm म्हणतात. या व्यवसायातून झालेला फायदा किंवा तोटा हा सामुहिक स्वरुपाचा असतो.
म्हणजेच एखाद्या उद्योग समूहाला व्यवसाय सुरु करायचा असेल, तेव्हा तो उद्योग समूह लोकांकडून काही वेळेस कर्ज स्वरुपात किंवा त्या व्यवसायाची काही प्रमाणात मालकी विकून भांडवल उभा करतो. कर्जाद्वारे पैसे उभे करणे याला बॉण्ड किंवा कर्जरोखे म्हणतात. तर मालकीद्वारे किंवा समभागाद्वारे भांडवल उभे केले जाते, त्या समभागास ‘शेअर’ असे म्हणतात.
वास्तविक, कोणतीही कंपनी जेव्हा भागभांडवलाद्वारे व्यवसाय सुरु करते, तेव्हा त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत ही किमान १० रुपये असते. पण जसजसा त्या कंपनीचा व्यवसायाचा विस्तार होतो, तेव्हा त्या शेअरचे मूल्य देखील वाढत जाते.
शेअर्सचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात
जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये आपले शेअर जारी करते, तेव्हा त्या शेअर्सना इक्विटी शेअर्स असे म्हणतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये सर्व लिस्टेड कंपन्या हे शेअर्स ट्रेडिंगसाठी आणत असल्याने, इक्विटी शेअरची शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक प्रमाणात खरेदी विक्री होते.
प्रेफरन्स शेअर्स हा इक्विटी शेअर्सचाच एक प्रकार असून, या शेअर धारकांना इक्विटी शेअरपेक्षा वेगळे मतदानाचे अधिकार असतात. तसेच इक्विटी शेअर्सप्रमाणे प्रेफरन्स शेअरसचे लाभांश दर हे अनिश्चित नसून, ते पूर्वनिर्धारित देखील असू शकतात.
इक्विटी आणि प्रेफरन्स शेअरपेक्षा डीव्हीआर शेअर्स हा वेगळा प्रकार असून, डी.व्ही.आर शेअरधारकांना इक्विटी शेअर धारकांप्रमाणेच फायदे मिळतात. पण या शेअर धारकांना १०० टक्के मतदानाचा अधिकार नसतो. अपेक्षित असेल, तिथेच डीव्हीआर शेअर धारकांना मतदानाचा अधिकार दिला जातो.
निष्कर्ष
शेअर मार्केट म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचा इतिहास, शेअरमध्ये गुंतवणूक कशी करावी यांसह अनेक महत्त्वाच्या विषयावर आज आपण माहिती जाणून घेतली. शेअर हा अतिशय जोखीमीचा प्रकार असल्याने, तिथे ट्रेडिंग करण्यापूर्वी शेअर मार्केटच्या इत्यंभूत माहितीसह तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यकत असते. त्यामुळे शेअर ट्रेडिंग करताना ब्रोकरची मदत घेणे हे फायद्याचे ठरते.
जर शेअर बाजार गुंतवणुकीसंबंधित तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल, पुढे दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा. आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील. किंवा तुम्हाला तुमचे डिमॅट खाते सुरु करायचे असेल, तर या (Open Demat Account) लिंकवर अवश्य भेट द्या!