आयपीओ हा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा अतिशय सोपा आणि सुरक्षित पर्याय असून, या माध्यमातून गुंतवणूकदार कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा कमवू शकतात. जर तुम्ही अशाच संधीच्या शोधात आहात, तर याची संपूर्ण माहिती जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
आयपीओ म्हणजे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering). याचाच अर्थ जेव्हा एखादी खासगी कंपनी आपले शेअर्स पहिल्यांदाच सामान्य गुंतवणुकदारांसाठी शेअर बाजारात आणतात, तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात.
या प्रक्रियेत कंपन्या त्यांचे शेअर गुंतवणूकदारांना विक्रीसाठी खुले करत असताना, ते शेअर बाजारात लिस्ट करतात. ज्यामुळे गुंतवणूकदार त्यात आपले पैसे गुंतवून, जास्तीत जास्त नफा कमवू शकतात. तसेच, या गुंतवणूकीतून कंपन्यांना मिळालेले भांडवल कंपनीच्या इतर विकासकामांमध्ये गुंतवून आपला विस्तार वाढवू शकतात.
उदाहरणार्थ, समजा तुमचं राजधानी दिल्ली येथे एखादे रेस्टॉरेंट आहे. आणि तुम्हाला आपल्या व्यवसायाची वृद्धी करुन त्यामाध्यमातून जास्तीत-जास्त नफा कमवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची शाखा चंदीगड मध्ये सुरु करायची असेल, आणि नव्या शाखेसाठीचा तुमच्याकडे सर्व आराखडा तुमच्याकडे तयार आहे. मात्र रेस्टारेंटच्या नव्या शाखेसाठी तुमच्याकडे पैसे किंवा भांडवल नाही.
अशावेळी बहुतांश उद्योजक हे बँकेकडून कर्ज घेणे पसंत करतात. मात्र, यामुळे तुम्ही तुमचा अधिकचा नफा कमविण्याच्या संधी कमी करत आहात असे तुम्हाला वाटत नाही का?
तेव्हा अशावेळी तुमच्यासाठी कोणते पर्याय फायदेशीर ठरु शकतात, ज्यामाध्यमातून तुमची पैशांची गरजही पूर्ण होईल, आणि तुम्हाला त्यासाठी व्याज देखील द्यावे लागणार नाही.
यासाठीच आयपीओचा पर्याय उत्तम असू शकतो. ज्यामध्यमातून तुम्ही तुमची कंपनी किंवा रेस्टॉरेंटचे काही भागभांडवल शेअर बाजारात विक्रीसाठी खुले करु शकता. ज्यामध्ये गुंतवणुकदार गुंतवणूक करुन नफा कमवू शकतात. तसेच, या भागभांडवलाद्वारे तुम्हाला तुमच्या कंपनीचा विस्तार करण्यास मोठी मदत मिळू शकेल.
एखादी कंपनी वेगवेगळ्या उद्देशांनी शेअर बाजारात आयपीओद्वारे प्रवेश करते, उदाहरणार्थ
सरळ शब्दात सांगयचे तर; आयपीओच्या माध्यमातून कंपन्या आपले शेअर्सना स्टॉक एक्सचेंज (NSE आणि BSE) द्वारे लिस्ट करतात. ज्यामुळे गुंतवणूकदार त्या शेअरमध्ये गुंतवणूक करु शकतील, आणि त्याच कंपनीत काहीप्रमाणात आपला मालकी हक्क राखू शकेल.
आयपीओसाठी एखाद्या कंपनीला अनेक टप्पे पार करावे लागतात, उदा.:
DRHP (Draft Red Herring Prospectus) तयार करणे, ज्यामध्ये तो आपल्या कंपनीची संपूर्ण माहिती जसे की, उद्योगाचे स्वरुप, कंपनीचा नफा किंवा नुकसान आदीची थोडक्यात माहीत द्यावी लागते.
या सर्व माहितीच्या आधारावर SEBI सदर कंपनीच्या आयपीओ अर्जाला मंजुरी देते. त्यानंतर ती कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होण्यासाठी आयपीओ घेऊन येते.
आयपीओचा अर्थ जाणून घेतल्यानंतर तुम्ही असा निष्कर्ष काढू शकता की, कोणतीही कंपनी आपले भांडवल आणि व्यवसाय वृद्धीसाठी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करतात. यासाठी कंपन्यांना वेगवेगळे पर्याय दिले जातात.
आयपीओचे हे विविध पर्याय कोणते याबद्दल आता जाणून घेऊया.
आयपीओचे मुख्यत: दोन प्रकारचे असतात.
या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेऊ इच्छिता का?
पहिल्या प्रकारामध्ये एखादी कंपनी गुंतवणूकदारांना एकप्रकारचा प्राईस बँड देते, ज्यामध्ये आयपीओचा प्राईस बँड ठरल्यानंतर त्याचा लिलाव होतो.
प्राईस बँडच्या निर्णय कसा होतो, हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे ठरते. कारण यासाठी कंपनी एखादा अंडरराईटर नियुक्त करते. हा अंडरराईटर त्या कंपनीचे २० टक्के शेअर्सवर बोली लावण्यासह वेगवेगळ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतो.
त्यानंतर अंडरराईटर त्या सर्व बोलींचे विश्लेषण करुन एक योग्य किंमत किंवा प्राईस बँड निश्चित करते. त्यानंतर आयपीओ अर्जासाठीचे खरे गुंतवणूकदार आणि इतर गुंतवणूकदार बोली लावतात.
नवावरुनच तुमच्या हे लक्षात आले असेल की, तुम्ही निश्चित केलेल्या किंमतीतच आयपीओ खरेदी करु शकता. यामध्ये आयपीची मागणी ही आयपीओ बंद झाल्यावरच समजू शकते.
म्हणजे एखाद्या शेअरचे मूल्य १०० रुपये असेल, तर तो शेअर त्याच तकत्यामध्ये ट्रेंड करेल. भलेही त्या शेअरची मागणी मार्केटमध्ये जास्त असो किंवा कमी असो.
आयपीओबद्दल अजून जाणून घेऊया आणि त्यात गुंतवणूक कशी करावी? हे देखील समजू घेऊया!
जेव्हा कोणतीही कंपनी आपला आयपीओ बाजारात विक्रीसाठी खुला करते, तेव्हा ती कंपनी एखादा विशिष्ट दिवस किंवा तारिख जाहीर करते. त्यामुळे नव्या गुंतवणूकदारांना ती तारिख किंवा दिवसाबद्दल माहिती असणे गरजेचे असते. ज्यामुळे त्यांना कोणत्याही समस्येचा समाना करावा लागू नये.
चला तर मग जाणून घेऊया आयपीओशी संबंधित विशिष्ट दिवसासंदर्भात;
आयपीओ दिवसाप्रमाणेच आयपीओच्या किमतीची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग आयपीओच्या वेगवेगळ्या किंमतींबद्दल जाणून घेऊया.
आता आयपीओशी संबंधित काही महत्त्वाच्या शब्दांबद्दल जाणून घेऊया
ग्रे मार्केट प्रीमियम (Grey Market Premium) किंवा आयपीओ प्रीमियम : ग्रे मार्केट हे एक अनऑफिशियल मार्केट असते. यामुळे याठिकाणी कोणतीही नियमावली नसते. तसेच याचे संचालन केवळ काही लोकांद्वारे म्युच्युअल ट्रस्टवर होते.
उदाहरणार्थ, एखाद्या आयपीओचा प्राईस बँड २०० रुपये आहे. तसेच त्याचा GMP (Gray Market Premium) १५० रुपये आहे. तर गुंतवणूकदार या आयपोलीचे शेअरसाठी ३५० रुपयेही देण्यास तयार असतात.
वरील उदाहरणावरुन तुम्हाला लक्षात आलेच असेल की, ग्रे मार्केट प्रीमियमची माहिती असणे किती आवश्यक आहे.
ग्रे मार्केट प्रीमियममुळे कोणत्याही आयपीओच्या मागणीबाबत माहिती मिळते. तसेच, प्रीमियमच्या अतिरिक्त मूल्यावरुन लक्षात येतं की, गुंतवणूकदार कितीप्रमाणात निश्चित केलेल्या मूल्यापेक्षा अतिरिक्त किंमत देऊन त्याची खरेदी करत आहेत.
त्यामुळे जर तुम्ही GMP द्वारे आयपीओ खरेदी करु इच्छित आहात, तर त्याच्या प्रीमियमवर तुमचे लक्ष असणे गरजेचे असते. आयपीओ oversubscribed झाल्याचे तुम्ही कधी ऐकलंय का? किंवा जेव्हा एखादा आयपीओ oversubscribed होतो, म्हणजे याचा अर्थ काय असतो?
जेव्हा एखादी कंपनी आयपीओ विक्रीसाठी खुला करते, तेव्हा वेगवगेळ्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या प्रमाणात शेअर्सचे वाटप करते. पण जेव्हा कंपनीने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्तीची मागणी होते, तेव्हा त्याला आयपीओचे oversubscribed होणे म्हणतात. आयपीओच्या oversubscribed होण्याने प्राथमिक बाजारात आयपीओची मागणी किती आहे हे लक्षात येते.
आयपीओ allotment म्हणजे, तुम्ही ज्या आयपीओसाठी अर्ज केला आहे, ते तुम्हाला मिळाले आहे किंवा नाही.
आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच उपस्थित झाला अशेल, तो म्हणजे कोणत्याही आयपीओचे वाटप कसे होते?
वास्तविक, आयपीओच्या प्राथमिक बाजारातील प्रदर्शनावरच हे निश्चित असते. जर एखादा आयपीओ कमी अंकांनी subscribe झाला असेल, तर प्रत्येक गुंतवणुकदारास आयपीओचे शेअरचे वाटप केले जाते. किंवा मोजक्याच गुंतवणुकदारांना याचा लाभ मिळतो.
एकदा स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाल्यानंतर आयपीओ शेअर बाजारातील दुय्यम म्हणजे सेकेंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतो.
जेव्हा अर्जदार लिस्टिंगमधूनच नफा कमावू लागतो, तेव्हाच हे शक्य होते. त्यामुळेच आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो.
आतापर्यंत आपण आयपीओ म्हणजे काय आणि त्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या शब्दावलीसंदर्भात माहिती घेतली. आता एखादा गुंतवणुकदार कोणत्या प्रकारे आयपीओसाठी अर्ज करु शकतो? हे जाणून घेऊया.
आतापर्यंत आपण आयपीओबद्दल सर्व माहिती जाणून घेतली असेल, तर आता आयपीओसाठी कसा अर्ज करावा हे आपण जाणून घेऊया.
आयपीओला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक असते.
डिमॅट खाते सुरु केल्यानंतर तुम्ही ASBA च्या माध्यमातून सहज अर्ज करु शकता.
ASBA म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल?
ASBA म्हणजेच Application Supported by Blocked Amount च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अँपमधून कोणत्याही आयपीओसाठी अर्ज करु शकता. तसेच, तुम्ही जितक्या किंमतीसाठी अर्ज करत आहात, तेवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात त्या क्षणी असणे आवश्यक असते.
जेव्हा तुम्हाला आयपीओ मिळतो, तेव्हा तुमच्या खात्यातून पैसे लगेच कमी होणार नाहीत, तर तुमच्या वापरासाठी ते पुन्हा उपलब्ध होतील. अशा प्रकारे आयपीओमध्ये अर्ज करणे अतिशय सुरक्षित मानले जाते.
आयपीओसाठी कसा अर्ज करायचा हे आता आपण जाणून घेऊया.
· Choice FinX मध्ये लॉग इन करा
· आयपीओ अँप्लिकेशनवर क्लिक करा
· जर एकपेक्षा अधिक आयपीओचे पर्याय असतील, तर तुम्हाला कोणता आयपीओ हवा आहे, त्यावर क्लिक करा.
· किती शेअर हवे आहेत आणि त्याचे मूल्य हवं आहे, त्याचा तपशील अर्जात भरा.
· त्याचे पैसे देण्यासाठी UPI ID भरा, आणि CONFIRM बटन वर क्लिक करा.
जेव्हा कोणत्याही कंपनीचा आयपीओ बाजारात येतो, तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये त्या कंपनीबद्दल प्रचंड उत्साह असतो. कारण गुंतवणूकदारांना कमी कालावधीत आधिक नफा कमावण्याचा हा एक उत्तम पर्याय वाटतो.त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही कंपनीचा IPO मध्ये गुंतवणूक करत असाल, तर त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल बद्दल संपूर्ण माहिती घ्या. जर ती माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल, आणि कंपनी भविष्यात चांगली कामगिरी करू शकते, असे वाटत असेल, तेव्हा यात तुम्ही त्यानुसार गुंतवणूक करा.